Ad will apear here
Next
उमेश झिरपे यांची ‘माउंट मेरा’ शिखरावर यशस्वी चढाई
६४७६ मीटर उंचीचे शिखर एकट्याने सर

पुणे : गिरिप्रेमी या प्रसिद्ध गिर्यारोहण संस्थेच्या प्रमुख मोहिमांचे नेते उमेश झिरपे यांनी ‘माउंट मेरा’ या नेपाळमधील सहा हजार ४७६ मीटर उंच शिखरावर यशस्वी चढाई केली. त्यांनी ही चढाई एकट्याने (सोलो) केली. ११ ऑक्टोबर रोजी सकाळी सातच्या सुमारास झिरपे ‘माउंट मेरा’ शिखरावर पोहोचले. नेपाळमधील सोलोखुंबू प्रदेशातील महालंगुर या हिमालयाच्या पर्वतरांगेमध्ये माउंट मेरा पर्वत आहे. 


५४ वर्षीय झिरपे हे ज्येष्ठ गिर्यारोहक असून, त्यांना हिमालयातील ४०हून अधिक शिखर मोहिमांचा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली गिरिप्रेमी संस्थेच्या संघांनी माउंट एव्हरेस्ट व माउंट कांचनजुंगासह सात अष्टहजारी (आठ हजार मीटरहून अधिक उंची असलेल्या) शिखरांवर यशस्वी चढाई केली आहे. अशी कामगिरी करणारे झिरपे हे भारतातील पहिले व एकमेव गिर्यारोहण मोहीम नेते आहेत. त्यांच्या गिर्यारोहण क्षेत्रातील कामगिरीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना यांना श्री शिवछत्रपती पुरस्काराने गौरविले आहे. माउंट मेरा हे शिखर सर केल्याने त्यांच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे.



(उमेश झिरपे यांची मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZXACF
Similar Posts
उलगडला कांचनजुंगा मोहिमेचा थरार! पुणे : गच्च भरलेले बालगंधर्व रंगमंदिर, क्षणाक्षणाला वाढती उत्कंठता, खिळवून ठेवणारी चलचित्रे अन शिखरमाथ्यावर भारताचा तिरंगा फडकण्याची दृश्ये समोर येताच, सभागृहात झालेला टाळ्यांचा कडकडाट. निमित्त होते ‘गिरिप्रेमी’च्या ‘माउंट कांचनजुंगा इको एक्स्पीडिशन २०१९’चा रोमहर्षक प्रवास पडद्यावर उलगडणाऱ्या ‘कांचनजुंगा-रत्नांचे
‘गिरिप्रेमी’च्या गिर्यारोहकांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक मुंबई : भारतातील अग्रगण्य गिर्यारोहण संस्था गिरिप्रेमीच्या संघाने जगातील तिसरे उंच शिखर ‘माउंट कांचनजुंगा’वर यशस्वी चढाई करून भारतीयच नव्हे, तर जगाच्या गिर्यारोहण इतिहासामध्ये नवा अध्याय रचला. या संघाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सर्व संघाचे कौतुक
‘गिरिप्रेमी’च्या कांचनजुंगा शिखरवीरांचा नागरी सन्मान पुणे : गिरिप्रेमी संस्थेतील १० गिर्यारोहकांनी १५ मे रोजी पहाटे जगातील तिसरे उंच शिखर माउंट कांचनजुंगावर यशस्वी चढाई करून भारताच्याच नव्हे, तर जगातील गिर्यारोहण इतिहासात नवा अध्याय रचला. गिरिप्रेमीने यशस्वी केलेली ही मोहीम कांचनजुंगा शिखर चढाई करण्यात यशस्वी ठरलेली सर्वात मोठी व सर्वात पहिली नागरी मोहीम ठरली आहे
‘गिरिप्रेमी’च्या कांचनजुंगा मोहिमेच्या छायाचित्र प्रदर्शनाला सुरुवात पुणे : गिरिप्रेमी संस्थेच्या गिर्यारोहकांनी १५ मे २०१९ रोजी माउंट कांचनजुंगावर केलेल्या यशस्वी चढाईदरम्यानची निसर्गाची विविध रूपे, गिर्यारोहकांचा चित्तथरारक प्रवास छायाचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना अनुभवता येणार आहे. या मोहिमेच्या चित्तथरारक प्रवासाच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन २१ सप्टेंबर रोजी पुण्यात करण्यात आले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language